मोदींना बोलण्यासाठी स्क्रिप्टची गरज नसते, भाजपकडून मनमोहनसिंगांना उत्तर

टीम महाराष्ट्र देशा – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टिकेला आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी उत्तर दिले आहे. यावेळी नक्वी म्हणाले, मनमोहन सिंग हे एक वरिष्ठ नेते आहेत. जेव्हा ते पंतप्रधान होते. तेव्हा कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन बोलत होते आणि आत्ताही ते तेच करत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांना कोणत्याही स्क्रिप्टची किंवा दिग्दर्शकाची गरज नसते.


पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मी सायलेंट पंतप्रधान होतो, असं मला लोक म्हणत. पण मी न घाबरता पत्रकार परिषदांना सामोरे जाणारा पंतप्रधान होतो. अश्या शब्दात नरेंद्र मोदी यांना टोला लावला होता. त्यावर केंद्रीय मंत्री नक्वी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे.