चीनशी सामनाचं काय, तर नाव घेण्याचे देखील मोदींमध्ये धाडस नाही; राहुल गांधींचे मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान

मोदी

दिल्ली: एप्रिल मध्यापासून भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील(LAC) तणाव वाढला असून चीनने या भागातील हालचाली देखील वाढवल्या आहेत. याचवरून आता काँग्रेसचे प्रमुख नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून थेट मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान दिले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांत चीनकडून भारतीय भूभागात करण्यात आलेल्या घुसखोरी संबंधातील कागदपत्रे वेबसाईटवरून संरक्षण मंत्रालयातर्फे हटवण्यात आल्या आहेत, असा आरोप देखील केला आहे.

तर, हि महत्वाची कागदपत्रे संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये, लडाख भागात चीनने घुसखोरी केल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, हि कागदपत्रे आता हटवण्यात आल्याचे आरोप राहुल गांधी यांनी लावले आहेत. राहुल गांधी यांनी, ‘ चीन का सामना करना तो दूर की बात, भारत के प्रधानमंत्री में उनका नाम तक लेने का साहस नहीं है. इस बात से इनकार करना कि चीन हमारी मातृभूमि पर है और वेबसाइट से दस्तावेज़ हटाने से तथ्य नहीं बदलेंगे’, असे ट्विट करत मोदींवर जहरी टीका केली आहे.

पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांना देखील कोरोना संसर्ग

दरम्यान, गलवान खोऱ्यात भारतीय व चिनी सैनिक आमने-सामने आले होते यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते तर, चीनच्या देखील ४० हुन अधिक सैनिकांचे प्राण गेल्याचे भारतीय सरंक्षण विभागाने लावला होता. मात्र, चीनने तो साफ फेटाळत त्यांचा एकाही सैनिकाचा मृत्यू न झाल्याचं सांगितलं होतं. तर, यानंतर केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी गंभीर प्रश्न उभे करत आरोप केले होते व चीनला जशास तसे उत्तर देण्याची मागणी देखील केली होती. त्यानंतर, मोदींनी चीनने भारताच्या भूभागातील एकही इंच जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचे सांगत आत्मनिर्भर भारतचा नारा दिला होता. तसेच, सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक ऍप्सवर बंदी आणत ‘डिजिटल स्ट्राईक’ केले होते.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : दूध भुकटी मुलं,महिलांना मोफत देणार राज्यसरकार

दरम्यान, चीनच्या हालचाली सॅटेलाइटमध्ये कैद झाल्या आहेत. पँगोंग लेकमध्ये चीन आपली शक्ती वाढवत असल्याचे सॅटेलाइट फोटोतून दिसून येत आहे. २९ जुलैच्या सॅटेलाइट फोटोमध्ये बारकाईने पाहिले असता असे दिसून येते की, चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदल फिंगर -५ आणि फिंगर -६ मध्ये तळ ठोकून आहे. फिंगर -५ वर पीएलएच्या तीन बोटी आणि फिंगर-६ मध्ये १० बोटी आहेत. प्रत्येक बोटीत १० जवान आहेत. म्हणजेच १३० जवान फिंगर -४ च्या अगदी जवळ तैनात आहेत. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिले होते.

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी व्याजाची रक्कम वसूल करु नये- विश्वजित कदम

तसेच, पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे चीनच्या या मुत्सद्देगिरीमुळे पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. चीनने फिंगर फोरमधुनही मागे हटावे ही भारताची मागणी आहे. एप्रिलच्या मध्यामध्ये जी स्थिती होती, तशी जैसे थे परिस्थिती पूर्ववत करा, असे भारताचे म्हणणे आहे. आता फिंगर एरिया कळीचा मुद्दा बनला आहे. आधी भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. पण चिनी सैन्याने फिंगर फोर पर्यंत घुसखोरी केली आहे. चीनने पूर्वीप्रमाणे फिंगर आठ पर्यंत मागे फिरावे ही भारताची मागणी आहे. जर चीनने माघार घेतली नाही तर मात्र पुन्हा दोन्ही देशातील संघर्ष वाढून परिस्थिती चिघळू शकते.