‘एक चहावालाच दुसऱ्या चहा वाल्याचे दु:ख जाणून घेऊ शकतो’

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम येथे प्रचार सभा घेतली यावेळी मोदी यांनी कॉंग्रेसला चांगलीच टोले बाजी केली आहे. तसेच कॉंग्रेस आता चहा वाल्यांचा आणि चौकीदाराचा तिरस्कार करत आहे. असे देखील मोदी म्हणाले.

आजची सभा ही चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आसाम मधील डिब्रूगड येथे होती. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मोदी म्हणले की, विरोधक आता चहा वाल्यांचा आणि चौकीदाराचा तिरस्कार करत आहेत. याआधी मला वाटायचे की ते फक्त चहावाल्याचा तिरस्कार करत आहेत, पण मी जेव्हा देशाचे दौरे सुरु केले तेव्हा मला कळालं की चहाशी निगडीत असलेल्या प्रत्येक प्रांताचा ते तिरस्कार करत आहेत. मग तो आसाम असो की पश्चिम बंगाल असो ते आता तिरस्कार करू लागले आहेत.

आसाम चे शेतकरी गेली सात दशके अनेक समस्यांना तोंड देत आहेत. तरी देखील कॉंग्रेस ने त्यांना किमान मुलभूत सुविधा देखील पुरवल्या नाहीत. त्यामुळे एक चहा वालाच दुसऱ्या चहावाल्याची दु:ख जाणून घेऊ शकतो.

दरम्यान, आसाम मध्ये १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे.