मोदी घालतात उलटे घड्याळ, पण अहो हि तर बाळासाहेबांची स्टाईल

namo and balasaheb thackeray

टीम महाराष्ट्र देशा: बॉलिवूड कलाकार अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी मुलाखात घेतली आहे. या मुलाखातीत अक्षय कुमारने मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. मोदींकडूनही या प्रश्नांना उत्तम प्रतिसाद मिळला. गैरराजकीय मुलाखतीमध्ये मोदींच्या जीवनाचे अनेक पैलू समोर आले आहेत. सत्ताधाऱ्यासह विरोधकांमध्ये देखील मुलाखतीची चर्चा रंगली आहे. यामध्ये आता विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी आपण अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले, तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ असं स्पष्टीकरण मोदींनी दिले.

Loading...

दरम्यान, मोदींनी घड्याळ घालण्याच्या स्पष्टीकरणावर सध्या समाज माध्यमांत जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला ठेवणे हि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठकारे यांची स्टाईलं असून मोदी ती कॉपी करतात, अशा पोस्ट सोशल मिडीयावर होत आहेत.

बाळासाहेब ठाकरे हे कायम उलटे घड्याळ घालायचे हे अनेक फोटोमध्ये दिसत आहे.

बाळासाहेबांप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उलटे घड्याळ घालतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील बहुतांश वेळा अशाच स्टाईलने घड्याळ घालतात