मोदी सरकार मधील एक असा मंत्री ज्याचे फॉलोअर्स आहेत ओबामापेक्षा जास्त 

gajendrasinghshekhawat

राजस्थानमधील शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले गजेंद्र सिंह शेखावत यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे . अत्यंत साधे राहणीमान असलेले शेखावत जेवढे ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत त्यापेक्षा जास्त सोशल मिडीयावर देखील लोकप्रिय आहेत . सोशल मिडीयावर त्यांच्या लिखाणाची एवढी क्रेज आहे की त्यांचे फॉलोअर्स अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा जास्त आहेत. 

 कोरा ही एक ब्लॉगिंग वेबसाइट आहे . शेखावत यांच्या  ब्लॉगला तब्बल 55600 फॉलोअर्स आहेत जे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा जास्त आहेत. कोरा ही एक प्रश्नोत्तरांशी निगडीत वेबसाईट आहे . शिवाय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक सोशल मिडीयाचा वापर करणारे ते मंत्री आहेत . याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधत असल्याने विशेष लोकप्रिय आहेत . 

 राजस्थान मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असल्याची चर्चा आहे . राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची कामे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत त्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजी वाढत चालली आहे त्यामुळे जोधपूरचे खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन काहीशी नाराजी दूर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची चर्चाआहे . भारतीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेखावत यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी जोडला गेला आहे . 
 याशिवाय शेखावत यांना वेगवेगळ्या  खेळांची देखील आवड आहे . बास्केट बॉल मध्ये ते राष्ट्रीय स्थरापर्यंत खेळले आहेत .बास्केटबॉल इंडिया प्लेयर्स एसोसिएशन चे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल चे ते सध्या सदस्य देखील आहेत.