fbpx

नरेंद्र मोदी भारताचे नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान वाटतात – केजरीवाल

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या नंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उपोषणाचे हत्यार मोदी सरकार विरोधात वापरताना दिसत आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या साठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले.

यावेळी नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे अनेक नेते पोहेचले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, ”जेव्हा कुणी एका राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो केवळा एका पक्षाचा मुख्यमंत्री नसतो तर तो संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा पंतप्रधान बनता तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असता. मात्र ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देतात त्यावेळी ते भारताचे नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान वाटतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना या मागणी साठी खूप विरोधाचा सामना करावा लागला होता. आज चंद्राबाबू नायडू यांनी पुकारलेल्या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शरद यादव यांनी पाठिंबा दिला होता.