इन्स्टाग्रामवर नमो लाट, सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर 

टीम महाराष्ट्र देशा – सध्या विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून मोदी लाट ओसरल्याचा देखील दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे.

मोदी हे इन्स्टाग्राम या सामाजिक संकेत स्थळावर जागतिक स्तरावरचे सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. इन्स्टाग्रावर मोदी यांचे 1 कोटी 48 लाख फॉलोअर्स आहेत.

ट्विप्लोमसी या ऑनलाईन मंचानं प्रसिद्ध केलेल्या लोकप्रिय नेत्यांच्या यादीत इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो दुस-या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिस-या क्रमांकावर आहेत.

पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार