मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखातून मोदींना फैलावर घेत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.
मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. असा चिमटा शिवसेनेनं मोदींना काढला आहे. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो.” असा सवाल सामना अग्रलेखाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला आहे.
ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे? कश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढले आहे. पंडित भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. केंद्र सरकारने पंडितांना सुरक्षेची हमी दिली होती, पण पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत. यात नेहरूंचा काय दोष? असही सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य आहे , पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले. मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा खोचक सवाल सामनातून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
-
- Andheri By Elections | भाजपच्या मुरजी पटेलांचा निवडणुक अर्ज भरण्याचा कार्यक्रम ऐनवेळी झाला रद्द, राजकीय चर्चांना उधाण
- Atul Bhatkhalkar | ‘फरक पडायला शिल्लक तरी काय राहिलंय तुमच्याकडे?’, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Andheri By Elections | अंधेरी पोट निवडणुकीत 50 वर्षांपासून विरोधात असलेल्या ‘या’ पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
- Jayant Patil | “शिवसेना फोडण्याचे पाप भाजपचंच”, जयंत पाटलांचा हल्लाबोल
- Ramdas Athvale | “उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार“