डोनाल्ड ट्रम्पला मागे टाकत मोदी बनले ‘नंबर १ फेसबुक किंग’

टीम महाराष्ट्र देशा : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली आहे. वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

सोशल मिडीयाचा वापर कशाप्रकारे करावा हे मोदींनी दाखवून दिले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मिडीयाचा नरेंद्र मोदी यांनी उत्तमरीत्या वापर केला आणि याचा त्यांना कितपत फायदा झाला हे त्यांनी मिळवलेल्या सत्तेमधून स्पष्ट झाले. सोशल मिडीयावर मोदी चांगलेच अँँक्टीव असतात. त्यांना सोशल मिडीयावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. लोकांपर्यंत अगदी सहज रित्या पोहचण्याचे फेसबुक हे अत्यंत लोकप्रिय व्यासपीठ आहे. मोदींनी नेमके हेच लक्षात घेऊन स्वताला पहिल्या स्थानावर पोहचवले आहे.