मोदी आणि उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर लाईव्ह टीव्हीवर लस टोचावी, मग मी लस घेणार- प्रकाश आंबेडकर

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती.

मात्र, या लशींबाबत अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. कोव्हॅक्सिन या लसीला परवानगी देण्याआधी तिसऱ्याटप्प्यातील चाचणी पूर्ण न झाल्याने तिला परवानगी कशी देण्यात आली यावरून वाद निर्माण झाला आहे. त्याच बरोबर लसीच्या शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामांची देखील भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, लसीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे की, करोना लसीवरील वाद योग्य नाही. संशय घेऊ नका. देशातील जनतेने नियामक संस्थांवर विश्वास ठेवावा, डाटाचा व्यापक अभ्यास केल्यानंतरच या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. म्हणून देशातील जनतेने नियामक संस्था, शास्त्रज्ञ आणि संशोधकांवर विश्वास ठेवला पाहिजे. असं डॉ.गुलेरिया म्हणाले.

तरी काही राजकीय नेत्यांनी आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली लस टोचून घ्यावी असं आव्हान दिलं आहे. आता, कोरोना लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वप्रथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर लस टोचावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या