मोदी आणि शाह लोकशाही संपवून टाकतील ; राज ठाकरेंचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे आपल्या प्रचार सभेतून जोरदार टीका करताना दिसत आहेत. मंगळवारी इचलकरंजी इथे झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मंगळवारी राज ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये सभा घेतली त्यावेळी बोलताना, ‘मोदी आणि अमित शाह हे दोघे या देशाला लागलेले कलंक आहेत, ते लोकशाही संपवून टाकतील’ अशा मोदी आणि शाह यांचा समाचार घेतला. तसेच शहीद जवानांच्या नावाने मतं मागितली जात आहेत. देशाला जी स्वप्न दाखवली, त्यावर एक शब्द बोलला जात नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. पुढे ठाकरेंनी मोदींची जुनी आश्वासनं आणि जुनी भाषणं दाखवत टीका केली.

राज ठाकरे जरी निवडणूक लढवत नसले तरी ते भाजपविरुद्ध प्रचार करत आहेत त्यामुळे त्यांच्या या प्रचाराचा फायदा भाजपच्या विरोधी पक्षांना नक्की होणार आहे.