इमरान खान आणि नरेंद्र मोदी एकाच आईची मुले : कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील कॉंग्रेसचे मोठे नेते आणि माजी मंत्री रामनाथ राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे दोघेही एकाच आईची मुले असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कर्नाटकच्या दक्षिणा कन्नड जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रामनाथ राय यांनी ‘नरेंद्र मोदी आणि इम्रान खान एकाच आईची मुले आहेत, निवडणुका जिंकण्यासाठी दोघेही एकमेकांविरूद्ध वक्तव्य करतात, दोघेही एकाच प्रकारचे नेते आहेत असं विधान केले आहे. तसेच हे सरकार कर्नाटकची चिंता करत नाही असंही त्यांनी म्हटले आहे.

Loading...

रामनाथ राय यांच्या या विधानावर भाजप नेत्या शोभा करंडलाजे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘कर्नाटकचे माजी पंतप्रधान पीएम मोदी आणि पंतप्रधान इम्रान खान यांची तुलना करून कॉंग्रेसमधील लोकांची विचारसरणी आणि संस्कृती पुन्हा एकदा समोर आली आहे आणि असे म्हणतात की, दोघेही एकाच आईची मुल आहेत, या पक्षाचे एकमेव कार्य म्हणजे आपला देश आणि पंतप्रधान यांची बदनामी करणे आहे असं करंडलाजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रामनाथ राय यांनी २३ मे २०१३ ते १५ मे २०१८ पर्यंत सिद्धारमैया यांच्या सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पहिले आहे. परंतु आता कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने ते विरोधात आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू