अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता

Maratha Kranti Morcha

टीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणा-या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात आहे. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्रकृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात आहेत.

मराठा क्रांती मोर्चा : आणखी एका युवकाची नदीपात्रात उडी

मुंबई पोलिसांकडून मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसंच कोणतीही अडचण आल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास 100 नंबर आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती देण्याची सूचना पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आली आहे. दरम्यान,मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून प्रत्येक आंदोलकाने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे अशी सूचना देखील देण्यात आली आहे.

मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही- बच्चू कडू

मराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले

मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता
हे करावे !
1. मराठा तरुणांनी हा बंद शांततापूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाची बदनामी होणार नाही, याबाबत जागरूक राहून बंद यशस्वी पार पाडावा.
2. कोणत्याही प्रकारच्या इतर समाजाच्या भावना दुखावणा-या आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यापासून स्वत:ला आणि इतरांना आवर घालावा.
3. इतर समाज बांधवांनी कृपया हे आंदोलन शासनासोबत असल्याने मराठा समाजाला सहकार्य करावे, जेणेकरून आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील.
4. प्रक्षोभक पोस्ट, व्हिडीओ व्हायरल न करता आपआपल्या जिल्ह्यांतील समन्वयक मराठा सेवकाांशी संपर्क ठेवून पोलीस प्रशासनाला गैरप्रकार करणाऱ्या लोकांची माहिती द्यावी.
5. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
6. आपल्या समस्या सोडविणे सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी होती आणि राहील. आपण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर असून राजकारणासाठी नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवून कृती करावी.

हे करू नये !
1. मराठा समाजाचा आक्रोश हा राजकीय पक्ष आणि सरकारविरोधी असून त्याला जातीय रंग देऊ नये.
2. रुग्णवाहिका आणि अतिमहत्त्वाच्या सेवा देणा-या सेवा दवाखाने, मेडिकल यांच्यावर बंदसाठी दबाव टाकू नये.
3. या आंदोलनादरम्यान घोषणा आणि आपला आक्रोश व्यक्त करीत असताना अश्लील भाषा आणि अनुचित प्रकाराचा वापर करू नये.
4. पोलीस प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.
5. पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण चिघळू देऊ नये.
6. महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
7. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये; अथवा गोंधळ माजेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत.
8. कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.