सलमानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणारा गजाआड

सलमान खान

मुंबई : सलमान खानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणाऱ्याला आज बांद्रा पोलिसांनी अटक केली आहे. काळविट शिकार प्रकरणी सलमानला जोधपुर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यानी सलमानच्या बांद्रा येथील घराबाहेर गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत विशाल रामलखन यादव याने तब्बल 13 मोबाईल लंपास केले होते.

यासंदर्भात बांद्रा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावरून पोलिसांनी सीसीटीवीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासात त्याने तब्बल 13 मोबाईल चोरल्याचं समोर आले आहे.