fbpx

नाशकात मोबाईल चोरी करणारे दोघे गजाआड

Mobile theft

नाशिक : शहरातील गंगेवरील बुधवारच्या बाजारात किरकोळ व्यावसायिकांचे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. अनेकदा येथील व्यावसायिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक शहर पोलिसांच्या युनिट एकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३५ मोबाईल हस्तगत केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे व पोलीस शिपाई जुंद्रे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुल कासार, वय १९ रा. मायको दवाखाना, पंचवटी नाशिक व विकी उर्फ टेमऱ्या विजय भुजबळ वय १९ रा. मोरेमळा, हनुमानवाडी पंचवटी या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३८ मोबाईल हस्तगत करण्यात आले. तर या गुन्ह्यातील अजून एक संशयित चिवड्या उर्फ सोनाल दशरथ बागड हा फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
या कारवाईत त्यांनी एमएच १५ ईव्ही ८५८२ व गुन्ह्यात होंडा कंपनीची मोपेड दुचाकी वापरली होती. यासह ३५ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, चोरीच्या सर्व मोबाईलचा आयएमईआय क्रमांकाची यादी पोलीस मुख्यालय आवारात लावण्यात आली असून ज्या नागरिकांचे फोन चोरीला गेले आहेत त्यांनी खात्री करून घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत.