मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवणार नाही, कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

टीम महाराष्ट्र देशा :- कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने ईव्हीएम हॅकिंग करता येऊ नये यासाठी स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर लावण्याची मागणी केली आहे.याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी काल (सोमवारी) पत्रकार परिषदेत घेतली.

यावेळी ते म्हणाले, ईव्हीएम यंत्रे फूलप्रूफ असल्याचे सिद्ध झाले आहे. या यंत्रांना बाह्य संपर्क यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बलदेव सिंह यांनी सांगितले.

तसेच आम्ही व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएम मशीन्सबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसंच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असं सिंग यांनी स्पष्ट केले .

दरम्यान, ईव्हिएम आणि व्हिव्हिपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देत जॅमर बसवण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...