मोबाईल कंपनी शिओमी ला भारत सरकारचा मोठा दणका!

xiaomi

दिल्ली: भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव हा कायम असून चीनच्या कुरघोड्या अजून देखील थांबलेल्या नसून सीमेजवळील हालचाली वाढल्याचे दिसून आले आहे. तर, भारतीय फौज देखील चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असून काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख दौरा देखील केला होता.

तर, यानंतर भारताने चीनला चोख उत्तर देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला असून सॉफ्टवेअर पासून ते हार्डवेअर सर्वच क्षेत्रात स्वावलंबी होण्याची तयारी सुरु केली आहे. तर, चीनपासून असलेली असुरक्षितता बघता भारत सरकारने अनेक चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. आज देशातील मोठ्या स्मार्टफोन मध्ये समावेश असलेल्या शिओमी या चिनी कंपनीला मोठा दणका देण्यात आला आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये असलेले प्रि-इंस्टोल्ड ब्राऊजरवर आता बंदी आणण्यात आली आहे.

‘आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की…’

‘Mi Browser Pro – Video Download, Free Fast & Secure’ विरोधात ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. हे ब्राऊजर मोबाईलच्या परफॉर्मन्सवर वाईट पद्धतीने काम करत असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यावरून कंपनीची सरकार सोबत बोलणी सुरु असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे ब्राऊजर सुरक्षित असून कोणताही वाईट परिणाम करत नसल्याचा दावा केला आहे. या संदर्भात लोकमतने वृत्त दिले आहे.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी बजावली साधू-पुरोहितांना नोटीस

शिओमी हि भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन विकणारी कंपनी ठरली असून १० कोटीहुन अधिक स्मार्टफोन युजर्स असल्याचे समजते. तर, याचसोबत QQ International हे चिनी ऍप देखील बॅन केले आहे. आतापर्यंत भारत सरकारने, २९ जूनला ५९ चिनी ऍप्स, २७ जुलैला ४७ ऍप्स बॅन करत ‘डिजिटल स्ट्राईक’ केले आहे

कोरोनामुळे MPSC ची परीक्षा पुढं ढकलावी, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी