मुंबईत जमाव बंदी लागू ; मुख्यमंत्र्यांना रामाचे दर्शन घेता येणार नाही

blank

टीम महाराष्ट्र देशा : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईमध्ये कलम १४४ अंतर्गत जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राम मंदिरात जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. हा निकाल पूर्णपणे रामलल्लाच्या बाजूने लागला आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज दुपारी वडाळा येथील राम मंदीरात राम दर्शनाला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र मुंबईमध्ये अचानक जमावबंदीचे आदेश दिल्यामुळे त्यांना राममंदिरात जाता येणार नाही.

न्यायालयाने रमलल्लाच्या बाजूने निकाल दिला असला तरी मुस्लीमांना ही अयोध्यात 5 एकर स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. देशात आणि राज्यात सर्वत्र आज आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे वडाळा येथील राम मंदीरात राम दर्शनाला जाणार होते. मात्र अचानक जमावबंदी लागू करण्यात आल्यामुळे त्यांना दर्शन घेत येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या :