सहकार क्षेत्रात मनसेची दमदार एन्ट्री तर शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही

मुंबई डिस्ट्रिक्‍ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत चार उमेदवार निवडून आणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार क्षेत्रात प्रवेश केला आहे. विजयी उमेदवारांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले. राज ठाकरे यांनी सहकार क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत व्हा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची ताकद वाढवा, असे आवाहन या वेळी केले.

शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलला निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. मात्र सहकार क्षेत्रात ताकद नसताना मनसेचे चार उमेदवार निवडून आले आहेत. राज यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात असून सेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

You might also like
Comments
Loading...