Share

MNS | एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या संपत्तीबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर मनसेची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा (Dussehra Melawa) पार पडला. यावर्षी पहिल्यांदा हा मेळावा दोन ठिकाणी पार पडला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिलाच मेळावा होता. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर टीकेचा पाऊस केला. अशातच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रतिक्रिया :

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना विचारलं. यावर उत्तर देताना, आनंद दिघे यांच्याबोसत काय झालं, कसं झालं, याबाबत मला काही माहिती नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देण मला योग्य वाटतं नाही, असं ते म्हणाले. तसेच जो अनुभव माणसाला स्वतः येतो त्यावर तो बोलू शकतो, मात्र, जो इतारांचा अवुभव आहे त्यावर मी बोलणार नाही, असं देखील ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी काय आरोप केले ?

आनंद दिघे यांचा मृत्यू झाला तेव्हा उद्धव ठाकरे भेटायला आले. यावेळी दिघे साहेबांनी ठाण्यात काय केलं, पक्ष कसा वाढला, संघटना कशी वाढली, कसे काम करत होते आता ठाणे जिल्ह्यात आपण काय करावं लागले अशी विचारपूस उद्धव ठाकरे करतील अशी अपेक्षा होती, मात्र, त्यांनी सर्वा आदी आनंद दिघेंची संपत्ती किती आणि कुठे आहे असं विचारलं, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसेच त्यांचा हा प्रश्न मला धक्काच बसला असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आनंद दिघे (Anand Dighe) साहेबांचं बँकेत खातंही नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभुती मिळवणारा एकनाथ शिंदे नाही, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा (Dussehra Melawa) पार पडला. यावर्षी पहिल्यांदा हा मेळावा दोन ठिकाणी पार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now