मुंबई लोकलसाठी मनसेचा आक्रमक पवित्रा ; केली हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

raj thackrey

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे.

दरम्यान आता मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे. या याचिकेवर आता उद्या 5 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

मनसेने आपल्या याचिकेत दोन लस घेतलेल्या सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दोन दिवसांपूर्वी सुनावणी दरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत वेगळी स्थिती आहे. असे सांगितले आहे. त्यामुळे वकीलच नाही तर अन्य क्षेत्रांतील लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा उपलब्ध करण्याबाबत विचार करण्याची सूचना यावेळी केली.

तर, गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी देखील निर्णय होण्याची शक्यता असून उच्च न्यायालयाने तसे आदेश दिल्यास राज्य सरकारला देखील यासाठी हिरवा कंदील द्यावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या