आयपीएलचे मराठीत समालोचन करा ॲमेझॉन नंतर मनसेकडून डिस्ने हॉटस्टारला पत्र !

raj-thackeray

मुंबई: मराठी भाषिक अस्मिता जपण्याचा आग्रह धरणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुरुवारी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ड या कंपन्यांना त्यांच्या ॲप मध्ये मराठी भाषा वापरण्याचा इशारा दिला होता. यावेळी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसला भेट देऊन सात दिवसाचा इशारा देखील दिला होता. तर आता ॲमेझॉन ला दणका दिल्यानंतर मनसेने आपला मोर्चा आयपीएल कडे वळवला आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांचा समालोचन मराठीत करण्यात यावे यासाठी मनसेकडून डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवण्यात आला आहे.

डिस्ने हॉटस्टार च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रादेशिक भाषांत सारखा मराठी भाषेत काही पर्याय द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे तर सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, तेलगू, कानडी, आणि बंगाली भाषेमध्ये देखील केले जाते असा सवाल करत हे पत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती मनसेचे कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरून दिली आहे.

हॉटस्टार कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून आयपीएलचा मराठी प्रेक्षक वर्ग देखील मोठा आहे असे असताना हॉटस्टार ला मराठीचा विसर पडला असल्याचे खडे बोल देखील मनसेने यावेळी सुनावले.

महत्वाच्या बातम्या