घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावली संजय निरुपमांची सभा

sanjay nirupam meeting ghatkopar

घाटकोपर: अनधिकृत फेरीवाल्यांच्या आंदोलनावरून मनसे आणि मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यात सुरु असलेल्या वादातील आणखीन एक भाग घाटकोपरमध्ये बघायला मिळाला आहे. घाटकोपरमध्ये संजय निरुपम हे सभा घेणार होते. मात्र सभा ठिकाणी निरुपम यांचे आगमन होताच काही मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सभा उधळून लावली तसेच खुर्च्याही भिरकावून फेकल्या आहेत.

घाटकोपरमध्ये असणाऱ्या संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपडपट्टीवासियांसाठी निरुपम हे सभा घेणार होते. मात्र मनसे कार्यकर्त्याकडून अचानक करण्यात आलेल्या घोषणाबाजीने एकच गोंधळ उडाला यावेळी च्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान पोलिसांनी निरुपम यांची सभा उधळून लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यापुढे संजय निरुपम याची प्रत्येक सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...