वसईत गुजराती पाट्या लावणारी दुकाने मनसैनिकांनी फोडली

mns pune

वसई: मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये काल राज ठाकरेंची तोफ पुन्हा कडाडली. राज यांचे शिवतीर्थावरील भाषण म्हणजे अस्सल ठाकरी शैलीची आठवण करून देणारे होते. सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना ठाकरी शैलीत टीका केली होती. तसेच काही लोकांकडून हळूहळू मुंबई आणि परिसराला महाराष्ट्रापासुन तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली होती.

Loading...

मागील आठवड्यात वसई तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनी वसईला थेट गुजरातमध्ये दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. काल राज ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभा संपवून परतणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाच ते सहा दुकानांची तोडफोड केली. तसेच दुकानांच्या पाट्या लोखंडी रॉडने तोडून काढल्या, दरम्यान  ही दुकाने गुजराती लोकांची असल्याच माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

मनसे संपली म्हणणाऱ्यांनी शिवाजी पार्कवर येवून बघावं

मुख्यमंत्री म्हणजे शिक्षकांचा आवडत पण विद्यार्थ्यांचा नावडता मॉनिटर आहेत

अर्थमंत्री दगडावर चढून.. सांबा सारखे .. हात करत होते..पुन्हा कळाल कि ते मुनगंटीवार आहेत म्हणजेच रजनीकांतचे बारावे डमी

श्रीदेवीने अस काय काम केल गेल कि त्याचा मृतदेह तिरांग्याम्ध्ये गुंडाळण्यात आला

निरव मोदी प्रकरण विसरवण्यासाठीच श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी इतकी चघळली गेली, नंतर बातमी आली की त्या दारू पिऊन गेल्या

श्रीदेवीचा मृतदेह राष्ट्रध्वजात गुंडाळणे ही महाराष्ट्र सरकारची चूक

मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये अनेक संपादकांना पत्रकारांना काढून टाकण्यात आलं

जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदली केली गेली.

तुम्ही जर हिटलर आणि त्याच्या प्रचारावरची पुस्तकं नीट वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की सध्या अमित शहा आणि मोदी त्याच पद्धतींचा वापर करत आहेत

पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा हे अक्षय कुमारचे सिनेमे हे केंद्रशासित पुरस्कृत आहेत.
जे विरोधात आहेत त्यांना संपवून टाकायचं.. ईडी असेल.. सीबीआय असेल… माझा जो राग आहे नरेंद्र मोदींवर तो या गोष्टींसाठी..

नितीन गडकरी साबणाच्या फुग्यासारखे घोषणांचे आकडे उडवत फिरत असतात

नितीन गडकरींना तर हौस आहे कुठेही गेले तरी एक लाख कोटी, दोन लाख कोटीचे आकडे सांगायचे. पण पैसे आहेत कुठे ?

शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अश्या घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.

नोकऱ्या आहेत पण महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्यांची माहिती दिली जात नाही आमच्याकडे कुंपणच शेत खात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीतून बसवलेले

बेरोजगारांची नोंदणी करायची नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढलाय, यामुळे भविष्यात भारतात किती बेरोजगार आहेत याची माहितीच मिळणार

राफेल विमान सौद्यात प्रचंड भ्रष्टाचार, मात्र सर्वच जण गप्पा आहेत

बोफोर्सपेक्षा देखील सगळ्यात मोठा घोटाळा ‘राफेल विमान’ खरेदीचा आहे. राफेल विमानाची किंमत आहे ५५० कोटी आणि सरकारने फ्रान्स सरकारकडून १६०० कोटींना घेतली आहे. हा भ्रष्टाचार आहे, यावर कोणी बोलत नाही. आणि हे काम कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स कंपनीला दिल गेलंयLoading…


Loading…

Loading...