सांगली मध्ये परप्रांतीयांविरोधात मनसेचा तुफान राडा

सांगली : राज ठाकरे यांच्या जोरदार कमबॅक मुळे मनसे आता अधिकच आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. मुंबईत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा उघडल्यानंतर आता मनसे सैनिकांनी सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी मध्ये तुफान राडा घातला आहे. कुपवाड एमआयडीसी मध्ये असलेल्या परप्रांतीयांना मनसे सैनिकांनी तुफान चोप दिला आहे. एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत हा प्रकार घडला.

सांगलीतील कुपवाड एमआयडीसीमधील विविध कंपन्यांच्या कारखान्यांमध्ये 20 ते 25 हजारापेक्षा जास्त परप्रांतीय काम करतात. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ते नेहमी कुपवाड बाजारात येतात. काल संध्याकाळी दैनंदिन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत आले असता, मनसे सैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर स्थानिकांचा रोजगार हिसकावून घेणाऱ्या परप्रांतीयांविरोधात हे आंदोलन असल्याच मनसे कडून सांगण्यात आलं आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...