मुंबईत फेरीवाल्यांकडून मनसे विभागाध्यक्षावर हल्ला

mns worker attacked by hookers

मुंबई: मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मनसे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. माळवदे हे आज दुपारी 3.30 च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशनवर गेले असता हि घटना घडली असून फेरीवाल्यांनी हा हल्ला केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती कळताच राज ठाकरे हे मालाडला रवाना झाले आहेत.

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसेकडून रेल्वे प्रशासनाला पत्रही देण्यात आल होत. मात्र रेल्वेकडून काहीच कारवाई होत नसल्याने आता मनसेस्टाईलने खळखट्यक आंदोलन केल जात आहे. दरम्यान आज अचानक मनसे कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे फेरीवाल्यां विरोधात मनसे आणखीन आक्रमक होणार असल्याच दिसून येत आहे.

 

 

Loading...