fbpx

मनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं

दीपक पाठक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चांगलेच सक्रीय झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.मध्यंतरी राज ठाकरे यांनी केलेला दौरा चांगलाच गाजला होता.मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढविणार कि नाही याबद्दल चर्चा सुरु होत्या. मात्र आता मनसेने आगामी लोकसभेच्या निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केलं आहे.

‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या आगामी वाटचाली संदर्भात भाष्य केलं. मनसे हा एक राजकीय पक्ष असल्याने लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुका मनसे लढविणार असल्याची माहिती दिली. कोणासोबत आघाडी करायची हा नंतरचा मुद्दा आहे मात्र निवडणूक लढविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान,मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र राज ठाकरेंना आघाडीत समविष्ट करून घेण्यास दोन्ही कॉंग्रेसचा विरोध असल्याचं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मनसे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

आघाडीकडून मनसेच्या इंजिनाला रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे यासंदर्भात शिदोरे यांना विचारले असता आम्ही आम्हाला आघाडीत सामील करून घ्या असा प्रस्ताव कुणालाही दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

2 Comments

Click here to post a comment