MNS । मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. तसेच कोश्यारींच्या या वक्तव्यावर मनसे नेते आक्रमक झाले आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई कोश्यारींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, असंही ते म्हणाले.
१०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, संदीप देशपांडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये असंही देशपांडेंनी सुनावलं.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते ?
कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी राज्यपाल म्हणाले होते की, मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP । महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त विधान
- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड
- Chandrashekhar Bawankule | संजय राऊत दिवसा स्वप्न बघतात – चंद्रशेखर बावनकुळे
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याचिका दाखल; मंत्रालयात सत्यनारायण पूजा घातल्याचा आरोप
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<