मनसेसाठी राष्ट्रवादीची कॉंग्रेसला विचारणा, महाआघाडीत मनसेला घेण्याची मागणी

sharad pawar and raj thackeray

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेमध्ये जवळीक निर्माण झाल्याच दिसत आहे, दोन्ही पक्षाचे नेते एका बाजूला भाजपवर निशाना साधत आहेत, तर दुसरीकडे एकमेकांवर स्तुतीसुमने देखील उधळली जात आहेत. आगामी निवडणुकांसाठी महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसपुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी निवडणुकांत सत्तेतील भाजपला विरोधीपक्षामध्ये बसवण्यासाठी कॉंग्रेसकडून सर्व विरोधकांसोबत महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलणी सुरु आहेत. राज्यातील आक्रमक चेहरा असलेल्या मनसेला सोबत घेतल्यास शिवसेनाला फटका बसू शकतो, त्यामुळे आता महाआघाडीत मनसेला देखील घेण्याची मागणी पुढे आहेत. दरम्यान, कोणत्याही नेत्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही