fbpx

मनसेच्या खळखट्याकला यश ; मल्टीप्लेक्स चालक नरमले !

टीम महाराष्ट्र देशा : मनसेने गेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्स विरोधात आंदोलन सूर केल होते. मल्टीप्लेक्स थियेटरमध्ये खाद्यपदार्थांचे अवाजवी दर लावले जातात. त्याविरोधात मनसे आक्रमक झाले असून त्यांनी मल्टीप्लेक्स चालकांवर हल्ला केला होता. मनसेच आंदोलन यशस्वी होताना दिसत असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या दराप्रश्नी हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे मल्टीप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

राज ठाकरे यांनी मांडलेले आक्षेप आणि केलेल्या सूचना खालील प्रमाणे

१) मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात खाद्य पदार्थांचे दर अवाजवी असतातच पण प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार सर्रास आढळतात.

२) चित्रपटगृहातील कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो ह्या तक्रारी देखील अनेकवेळा आल्या आहेत.

३) मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते आणि ह्यासंबंधी तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.

४) त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर ह्यासंबंधीची तक्रार कुठे करावी ह्याचा तपशील दाखवावा जेणेकरून प्रेक्षक नाडला जाणार नाही.

५) चहा, कॉफी, पाण्याची बाटली, सामोसा,पॉपकॉर्न आणि बटाटा वडा हे पदार्थ जे सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून खाल्ले जातात त्यांचे दर माफक असावेत, बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्षेप असण्याचं कारण नाही.

६) लहान मुलांसाठीच अन्न, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना बाहेरील अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्याची परवानगी मिळायलाच हवी.

या आंदोलनाचा परीणाम म्हणून येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या पसंतीच्या काही खाद्यपदार्थांचे दर किमान 50/- रुपयांवर आणू, असं आश्वासन थियटर चालकांकडून राज ठाकरे यान देण्यात आलं.

१)पाण्याची बाटली, चहा, कॉफी, पॉपकॉर्न, सामोसा आणि बटाटावडा ह्यांचे दर पन्नास रुपयाच्या आसपास ठेवले जातील.

२) प्रेक्षकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याचं निवारण करण्यासाठी कोणास संपर्क करावा ह्याचा तपशील चित्रपटगृहात पडद्यावर दाखवला जाईल.

३) लहान मुलं, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना त्यांच्यासाठी आवश्यक अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्यावर कोणताही मज्जाव केला जाणार नाही.

दिलेल्या आश्वासनांप्रमाणे दर कमी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज ठाकरे यांचा कडून देण्यात आला आहे. राज्य सरकारला मराठी माणसांची काही चिंता पडलेली नाही. सर्वसामान्य मराठी माणसाला रोजच्या जीवनात काय समस्या भेडसावतात याच्याशी राज्य सरकारला काही सोयरसुतक नाही, म्हणूनच खाद्यपदार्थांच्या दरासाठी असो किवा मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी असो, मनसेला कायदा हातात घ्यावा लागतो, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले.

जैनेंद्र बक्षी यांनी सिनेमांगृहातीलबाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने बाहेर पाच रुपयांत मिळणारे पाॅपकाॅन मल्टीप्लेक्समध्ये २५० रुपयांना विकल जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मनसेने मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील इतर ठिकाणी आदोलनं केल होतं.

धक्कादायक; राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न