राज ठाकरेंच्या भाषणातील ‘२०’ मुद्दे, ज्यामुळे मोदी – शहांची झोप उडू शकते

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवाजीपार्कवर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर शरसंधान साधले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मोदींच्या अनेक धोरणांची पोलखोल केली आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Loading...

१. देशाला सध्या नरेंद्र मोदी व अमित शहा या व्यक्तींपासून धोका आहे, त्यामुळे राजकीय पटलावर ते दिसणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी काळजावर दगड ठेवून कॉंग्रेस – राष्ट्रवादीला फायदा होतो की कोणाला, याचा विचार न करता भाजपच्या विरोधात काम करा.

२. मोदींना हटवा म्हंटल्यावर अनेक लोक म्हणतात दुसरा पर्याय काय ? पण देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्यासमोर कधीचं पर्याय नव्हता. महात्मा गांधींनी ठरविले म्हणून नेहरू पंतप्रधान झाले. पुढे जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्याशिवाय लोकांना पर्याय होता का? मग आत्ताचं ही पर्यायाची चर्चा का केली जाते, एकदा मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला. आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या.

३. नोटबंदी संपूर्णपणे फसली आहे, ९९.३% पैसा बँकेत परत आला, नोटबंदी जाहीर करतेवेळी मोदी म्हणाले होते, ५० दिवसांत सगळे सुरळीत नाही झाले तर मला कोणत्याही चौकात हवी ती शिक्षा द्या. आता मोदींनीच चौक ठरवावा.

४. हिटलर आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवायचा, मोदी देखील हिटलरची कॉपी करत आहेत.

५. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील, हे मी आधीच सांगितले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुद्दामून युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली गेली. मोदी – शहा यांनी जवानांच्या बलिदानाचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न चालविला आहे.

६. राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वापरून घेत आहेत. अशी कुजबुज भाजपवाल्यांनी  सुरु केली आहे, पण आघाडीला माझा वापर करून देयला मी इतका वेडा नाही.

७. देश संकटात असतो तेव्हा वेगळा विचार करणं आवश्यक असतं. मोदींच्या संकटातून देश काढायचा असेल तर त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढविता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे.

८. नमामि गंगेसाठी २० हजार कोटी खर्च करू म्हणाले ,गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी.डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी १११ दिवस उपोषण करून ते वारले.

९. मोदींनी सत्तेत आल्यावर आधार कार्ड योजनेचं जोरदार समर्थन केलं पण हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांच फावेल, माझ्या नागरिकांना मिळणारे फायदे स्वतः लुबाडतील. एवढा विरोध होता मग आधार कार्ड योजना का राबवली?

१०. मला कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं नाही पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो

११. नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळालं, अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळालं नाही. इतकं अफाट बहुमत घेऊन आलेला हा पंतप्रधान पण देशाची पार वाट लावून टाकली. अगदी अडवाणींच उदाहरण घ्या त्यांना काय वाटत असेल एक आज त्यांना नाकारलं जात आहे

१२. पाकिस्तानचं विमान पाडलं असं नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितलं. पण आजच एक बातमी आहे की ज्या अमेरिकेने f १६ विमानं पाकिस्तानला पुरवली आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तानच एक विमान पाडलं गेलं नाही

१३. आमच्या पंतप्रधानांची ओळख जगभरात फेकू अशी असते, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींच नाव येतं. ही माझ्या पंतप्रधानांची इमेज आहे जगभरात.

१४. मी रतन टाटांच्या सांगण्यावरून त्यावेळी गुजरातला गेलो, तिथे मला जे जे दाखवलं त्यावरून मी माझं मत बनवलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला तेवढंच दाखवलं गेलं जेवढं दाखवयाच्या लायकीचं होतं. राहुल गांधी म्हणाले तसे ह्या मोदींनी खूप काही शिकवलं.

१५. काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी भाजपने स्वतःच्या योजना म्हणून घोषित केली. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत, भाजपला पंतप्रधान किंवा भाजप हीच का नावं सुचतात. आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली पण त्यांची नावं प्रकल्पाना का देत नाही

१६.नोटबंदीमुळे ४ कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकं रांगेत मृत्यमुखी पडली, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावत आहेत. ही भीषण परिस्थिती आहे सध्या.

१७. जवान अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमा राखत असतात, पण त्यांच्यासाठी काही करायचं मोदींना गेल्या ५ वर्षात सुचलं नाही पण त्यांच्या शौर्यावर नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्याची स्वप्न बघत आहेत. ह्याची लाज कशी वाटत नाही

१८. आमच्या जवानांवरती काश्मीरमध्ये हल्ले होत होते, स्थानिक लोकं त्यांच्यावर हल्ले करत होते, पण जवान काही करू शकत नाही कारण त्यांना माहित आहे आपल्यावर कारवाई होणार. नरेंद्र मोदी नवाज शरीफांना भेटायला, केक भरवायला गेले, आणि त्यानंतर लगेच पठाणकोट हल्ला झाला, उरी झालं.

१९. अमित शाह नी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केलं की आम्ही २५० माणसं मारली. अमित शाह गेले होते का को पायलट म्हणून? एअर चीफ मार्शल म्हणतात की आम्हाला किती माणसं गेली ह्याचा आकडा देता येणार नाही मग भाजपने कुठून हा शोध लावला

२०. नरेंद्र मोदी म्हणाले होते की बीफ एक्स्पोर्ट करणारे माझे अनेक जैन मित्र आहेत.भाजपशासित राज्यांमध्ये गायी पोषक अन्न मिळालं नाही म्हणून गेल्या. हे कोणतं भाजपचं आणि मोदींचं गो प्रेम. आणि तरीही गोबंदीच्या नावाखाली अनेक माणसांना मारलं गेलं. हा उन्माद देशभर पसरलेला असताना मोदी शांत होते

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा