fbpx

भाजपचा ‘पोस्टर बॉय’ मनसेच्या स्टेजवर, राज ठाकरेंनी केली सरकारची पोलखोल

raj thackeray at solapur

सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड पाठोपाठ सोलापूरमध्ये सभा घेत भाजप सरकारची पोलखोल केली आहे, डिजिटल गाव म्हणून सरकारकडून जाहिरात केल्या जाणाऱ्या हरिसाल गावाचा ग्राउंड रिपोर्ट माडल्यानंतर, आता हरीसालच्या जाहिरातीमध्ये ‘मी लाभार्थी’ म्हणून दाखवलेल्या युवकाला थेट स्टेजवर आणत राज यांनी भाजपचा बुरखा फाडला आहे.

सरकारकडून  डिजिटल गाव म्हणून अमरावती जिल्ह्यातील हरिसाल गावाची जाहिरात करण्यात येत होती, या गावामध्ये सर्व गोष्टी डिजिटल केल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात हरिसालचा व्हिडीओ समोर आणत सरकारचे दावे खोटे असल्याचं राज ठाकरे यांनी दाखवून दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे हरिसालला गेलेच नाही, असा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी राज यांनी थेट जाहिरातीमधल्या लाभार्थ्यालाच स्टेजवर आणले.

यावेळी राज ठाकरे यांनी हरिसाल डिजिटल जाहिरातीमधील मुलगा आता नोकरी नाही म्हणून रोजगारासाठी पुण्यात आला, त्याला आमच्या लोकांनी शोधून आणल्याच सांगितले. तसेच मुख्यमंत्री राज्यभरात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्याचं सांगतात, पण कोणत्या विहिरीवर मुख्यमंत्री पाणी काढायला गेले, असा सवाल त्यांनी विचारला आहे.