‘हा’ स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे, मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात जो बोलेल त्यांच्यावर ईडीच्या केसेस टाकल्या जातात. मोदी आणि शाह तुम्ही देखील विरोधात जाणार आणि तुमच्यावर देखील केसेस पडणार हे विसरू नये, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

नोटबंदी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला . पंतप्रधान शहीद जवानांच्या नावावर मत मागत आहेत, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रस्त्यावर येऊन सांगतात की लोकशाही धोक्यात आहे, पुलवामा मध्ये जी दुर्दैवी घटना घडली, त्याची पूर्वसूचना दिली होती, आरडीएक्सचा धोका आहे हे माहीत असून देखील पुरेशी काळजी का घेतली गेली नाही ?असा सवाल त्यांनी  उपस्थित केला आहे.

दरम्यान, राफेल मुद्यावरून देखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरल आहे. एचएएल सारख्या सरकारी कंपनीला डावलून अनिल अंबानी यांना राफेलचं काम का दिले गेलं, प्रश्न विचारला की हेच देशद्रोहाची आणि देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटणार?