मी नाही पवारांनीच माझे बोट धरले आहे, राज ठाकरेंचे सूचक विधान

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेत मोदीविरोधात प्रचार सुरु केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे, राज ठाकरे यांनी भाजपच्या टिकेकडे लक्ष न देता राज्यामध्ये सभा घेण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वाढलेली जवळीक राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचं सांगितल होत, हाच धागा पकडत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना देखील पवारांचे बोट धरून पुढे येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी मिश्कील उत्तर देत मी नाही, त्यांनीच माझं बोट धरलंय, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यात घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा दाखला देत, नरेंद्र मोदी यांनी पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचं सांगितल. मात्र मुलाखतीवेळीचा फोटो नीट पाहिल्यास, पवार यांनीच माझे बोट धरल्याचं दिसेल, असे सूचक विधान केले आहे.

Loading...

राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार

राज ठाकरेंचे बोलवते धनी वेगळे असून त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, तर अजित पवार यांनी राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे असून त्यांना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागतेय’ असे प्रत्युत्तर दिले होते.