राज ठाकरेंविरोधात पोस्ट टाकणाऱ्याला तरुणाला मनसेकडून बेदम मारहाण

mns pune

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने राग अनावर न झाल्याने मारहाण झाल्याचं वृत्त आहे.

सदर घटना ही अंबरनाथमध्ये घडली आहे. संदीप तिवारी नावाच्या युवकाने व्हॉट्सअप ग्रुपवर राज ठाकरेंच्या विरोधात पोस्ट टाकली होती. यामुळे रागावलेल्या मनसैनिकांनी संदीप तिवारीचे घर गाठले आणि त्याला जबर मारहाण करत उठाबशाही काढायला लावल्या. त्यानंतर त्याला मनसे कार्यालयात आणण्यात आले.

दरम्यान, मनसेकडून भूतकाळात अशा प्रकारचे कृत्य बऱ्याच वेळा करण्यात आले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.