सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मनविसेचे ‘गोट्या खेळो आंदोलन’

mns protest in pune university

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात मनविसेतर्फे गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले. विद्यापीठातील परीक्षा मूल्यमापन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुनर्मूल्यकनाचा निकाल लवकर लागत नाही, परीक्षा वेळेवर होत नाही, पेपर फुटीचे प्रकार घडतात, गुणपत्रिकेत चुका असतात अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत, याला केवळ परीक्षा विभागच जबाबदार आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.अशोक चव्हाण यांच्या हकालपट्टीची मागणी मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.

दरम्यान पंधरा दिवसांच्या आत जर हकालपट्टी करण्यात आली नाही तर अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील मनवीसे तर्फे देण्यात आला आहे.