…आणि मनसेने बसवले सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांना खड्यात !

चंद्रकांत पाटील

पुणे: १५ डिसेंबरनंतर रस्तावर खड्डे असतील तर आपण स्वतः खुर्ची टाकून बसत खड्डे बुजवण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. मात्र अद्याप अनेक ठिकाणी रस्तावर खड्डे असल्याच दिसत आहे. त्यामुळे आज मनसेने थेट चंद्रकांत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा खाड्यांमध्ये बसवत आंदोलन केले आहे. पुणे सातारा रोडवर कात्रजजवळ हे आंदोलन करण्यात आल.

राज्यभरातील रस्तांवर खड्यांचे साम्राज्य झाल्याने नागरिकांसह विरोधी पक्षांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरची डेडलाईन देत सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. या मनसे स्टाईल आंदोलनात मनसेचे वसंत मोरे, रुपाली पाठील-ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते