महापालिका निवडणुकांसाठी मनसेची व्यूहरचना; राज ठाकरेंनी दिले महत्वाचे आदेश

raj thakrey

मुंबई : कोरोना काळानंतर राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं धुमशान सुरु झालं आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूक अवघ्या काही दिवसांनवर आल्या आहेत. तर, औरंगाबाद, कोल्हापूर सारख्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणूका देखील आता जवळ आल्या आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी आपल्या कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी देखील उपस्थित होते. आजच्या या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात मनसेची रणनीती आखण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला माहिती दिली आहे.

‘राज ठाकरे यांनी विविध महापालिका व स्थानिक निवडणुकांसाठी प्रत्येक शहरानुसार टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा या टीममध्ये सहभाग असेल.’ आजच्या बैठकीमध्ये इतर पक्षाशी युती वा आघाडी करण्याबाबत चर्चा झाली का ? असा सवाल त्यांना करण्यात आला असता, ‘सद्या मनसेने पूर्णपणे स्वबळावर लढण्यासाठीची तयारी सुरु केली आहे’ अशी माहिती दिली आहे. तर, पूर्ण ताकदीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या