शिवसेनेची माघार मात्र राज ठाकरे उभे राहिले बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी

मुंबई : वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संप सुरु केला आहे, मुंबई महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेच्या कामगार संघटनेने सुरुवातीला या संपला पाठींबा देत पुढे माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेतील काही पदाधिका-यांनी पदाचे राजीनामे देखील दिले. आता शिवसेनेने माघार घेतल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बेस्ट संपला पाठींबा देण्यात आला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या लढाईत मनसे अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभी राहील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी ११ वाजता बेस्ट कर्मचारी आणि राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर बैठक पार पडली आहे.

एकीकडे राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केलेला असताना, दुसरीकडे शिवसेनेनं संपाला दिलेला नैतिक पाठिंबा मंगळवारी काढून घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेतील काही पदाधिका-यांनी पदाचे राजीनामे देखील दिले आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांसोबत बैठक बोलावली आहे.