Share

MNS | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांना मनसेकडून उत्तर; म्हणाले, “हिमालयातून आलेल्या….”

MNS| मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता मनसेनेही राज्यपालांवर टीका केली असून ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक जुनी ऑडिओ क्लिप शेअर केली असून यामध्ये त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले आहेत.

“काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजीमहाराज’च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपाल कोश्यारी यांना कळावं यासाठी ही चित्रफीत,” अशा कॅप्शनसहित मनसेने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

 

या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी बोलत आहेत. “या ऊर्जेचा स्त्रोत पाहिला तर यामागे तीन अक्षरं दडली आहेत, ती म्हणजे शिवाजी.  महाराजांचं निधन झालं १६८० मध्ये. १६८१ ला औरंगजेब महाराष्ट्रात आला. पुढील १६८१ ते १७०७ हा २७ वर्षांचा कालखंड औरंगजेब महाराष्ट्रात होता. या काळात संभाजीराजेंचं त्यांच्याशी युद्ध झालं. ताराराणी, संताजी धनाजी, राजाराम महाराजही होते. हे सगळं २७ वर्ष चालू होतं. या काळात औरंगजेबाने पाठवलेल्या पत्रांमध्ये महाराष्ट्रात जो काही विरोध झाला, लढाया झाल्या त्याचं वर्णन ‘शिवाजी अजून मला छळतोय’ असं केलं होतं,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

“ती पुढे लढण्याची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणत होता. आजही त्याच प्रेरणेवर महाराष्ट्र उभा आहे. पेशवे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहास देखील याच प्रेरणेवर आहे. अजूनही तीच एक प्रेरणा आपण पुढे घेऊन जात आहोत. इतकी मोठी व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आली आणि देशाला ही प्रेरणा दिली हे आपलं भाग्य आहे,” असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

MNS| मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now