सरकार हेरगिरी करत असल्याचा मनसेचा गंभीर आरोप

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.

मनसेची रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाबाबत पत्रकार परिषद सुरु होती. पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशात पोलीस असल्याच संशय मनसे कार्यकर्त्यांना आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता ते पोलिसच असल्याचं समोर आल्याचं मनसेच म्हणणं आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्यानं त्यांनी चौकशी केली असता ते पोलिसच असल्याचं समोर आल्याचं मनसेचं म्हणणं आहे. रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ही पत्रकार परिषद सुरु होती.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुद्धा काहीदिवसांपूर्वी असाच आरोप केला. त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्याचं समोर आलं होतं. तसेच विरोधी पक्ष नेत्यांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला होता. आता मनसेनेही असाच आरोप केल्यामुळे राजकीय चर्चा रंगली.