पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, मात्र राज गर्जना होणारच मनसेचा निर्धार

मनसेकडून चर्चगेट रेल्वे स्टेशनवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र पोलिसांनी जरी परवानगी दिली नसली तरी मोर्चा तर काढणारच असा पवित्र मनसेकडून घेण्यात आला आहे. दरम्यान मोर्चावेळी राज ठाकरे हे चक्क ट्रकवर उभे राहून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार आहेत

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात २३ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हि दुर्घटना झाल्यानंतर रेल्वेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. आज मुंबईमधील अशाच रेल्वेच्या समस्यांवर मनसेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दस्तुरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मैदानात उतरणार आहेत.