fbpx

मनसेची हायकोर्टात धाव मात्र शिवसेनेला कोर्टाचा तूर्तास दिलासा

Shivsena-vs-MNS

मुंबई: मनसेला सोडचिठ्ठी देणाऱ्या सहा नगरसेवकांना आणि शिवसेनेला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये हायकोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.

दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांसह शिवसेना गटनेते यशवंत जाधव आणि कोकण विभागीय आयुक्तांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुनावणी लवकर घेण्यासाठी बुधवारी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. दरम्यान, तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ऑगस्टमध्ये होणारी ही सुनावणी लवकर जूनमध्ये घेऊ, असे स्पष्ट केले.