मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काढून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव

ठाणे: सरकारकडून मनसेचा एवढा धसका घेण्यात आला आहे कि आमची सभा असली कि वीज , केबल बंद करावी लागते त्यामुळे हे सरकार घोचू सारख वागत असल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यामध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी राज यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्याने मनसे कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवर टीका करत आज ‘सत्ता असल्यामुळे भाजपकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर दरोड्याच्या केसेस टाकल्या जातात, मात्र उद्या सत्ता गेल्यावर आम्ही तुमच्यावर दरोड्याच्या केसेस टाकणार’ अशा इशारा दिला आहे.

राज यांच्या सभेतील मुख्यमुद्दे
२ महिन्यांपूर्वी माझ्या मित्राच्या घरची लोकं वाराणसीला गेले होते, तिथे गंगेत बोटीत फिरताना प्रेतं वर येत होती, वाराणसी मोदींचा मतदारसंघ पण तुम्हाला तोच स्वच्छ ठेवता येत नाही पण ते देखील तुम्हाला जमत नाही आणि तुम्ही कसल्या स्वच्छ भारताच्या गप्पा मारताय?

कित्येक वर्ष गुजराती या शहरांत गुण्यगविंदाने राहत होते, तेंव्हा कधी नाही मांसाहाराचा वास येत नव्हता, भाजपचे सरकार आल्यापासून या सगळ्या गोष्टी कश्या सुरु झाल्या? जैन मुनीम फतवे कसे काढतात पर्युषण काळात मांस बंदी करा म्हणून? तुम्ही जर आरे केलंत तर आमच्याकडून कारे होणारचं.

बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे कारण त्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाहीयेत. मी मोदी पंतप्रधान झाल्यावर म्हणलं होतं की आता गुजरातचा नाही देशाचा विचार करा.बुलेट ट्रेन सुरु करताना अहमदाबादचा विचार कसा येतो?जर मोदींना गुह्रातच प्रेम वाटू शकतं तर राज ठाकरेला महाराष्ट्राचं प्रेम का वाटू नये?

संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालं, त्याची जखम आजही भळभळत आहे या गुजरातच्या मनात, आणि म्हणूनच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काढून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरु आहे

महाराष्ट्र आपापसातच भांडतोय, त्यात बाहेरच्यांचं फावतंय

बुलेट ट्रेन ही फक्त गुजरातसाठी आहे, एक लाख कोटींचं कर्ज देशातल्या प्रत्येक नागरिकाने फक्त गुजरातच्या माणसासाठी फेडायचंय
मोदींना गुजरातच्या माणसाविषयी प्रेम असेल, तर राज ठाकरेला महाराष्ट्राच्या माणसाविषयी नसेल का?

भाजपला काय करायचं हेच समजत नाही, ‘घर का ना घाट का’ अशी अवस्था

आमच्यावरची कलमं कमी करा यासाठी पोलिसांच्या बाजूने उभा राहत नाही, पोलीस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी आंदोलनं असतात

फेरीवाल्यांबाबत हायकोर्टाने जो निर्णय दिलाय, त्याला सरकार सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे लावण्याच्या तयारीत आहे

ग्रामीण भागावर खर्च करायला पैसे नाही, सगळा पैसा शहरात जातोय, जिथे परप्रांतीय येत आहेत

भाजपवाल्यांनो नीट समजून घ्या, जेव्हा सत्ता बदलेल तेव्हा दरोड्याच्या केस तुमच्यावरही पडतील

हातातली जमीन गेली की कपाळावर हात मारण्याशिवाय काही उरणार नाही. जगातली सगळी युद्ध ही जमिनीच्या मालकीसाठी झाली.
भूगोलाशिवाय इतिहास नाही. आज आपण महाराष्ट्राची जमीन सहजपणे इतरांच्या हातात देतोय.

महाराष्ट्र जातीच्या राजकारणात गुंतलाय, आपल्याला जातीच्या राजकारणात गुंतवण्याचा डाव सुरु आहे आणि याला खतपाणी घालणारे महाराष्ट्रातलेच नेते आहेत.
छट पूजेला माझा विरोध नाही पण छट पूजेच्या माध्यमातून रस्त्यावर ताकद दाखवायचा प्रयत्न सुरु आहे.

राजीव गांधींनंतर इतकं बहुमत मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, वाटलं होतं की काही बरं करतील पण नाही ते आज नको त्या गोष्टीत गुंतलेत

महाराष्ट्रातला मुसलमान जिथे राहतो, तिथे दंगली होत नाहीत, बाहेरचे जिथे येतात तिथेच दंगली होतात

२०१४च्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो की बांग्लादेशी घुसखोरांना बॅग भरून बाहेर पडावं लागेल, पण काहीच घडलं नाही

राजीव गांधींनंतर इतकं बहुमत मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, वाटलं होतं की काही बरं करतील पण नाही ते आज नको त्या गोष्टीत गुंतलेत

महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार, पण बाहेरचे येऊन डोळ्यासमोर रोजगार घेऊन जात आहेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात की कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड भाषेत बोलावं लागेल, अशी हिम्मत आहे का देवेंद्र फडणीवसांमध्ये?

आपलं राज्य वाचवायचं असेल तर सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र या

बँकांचे व्यवहार मराठीतून झाले पाहिजेतLoading…
Loading...