शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

raj-thackeray

मुंबई: गुढीपाडवा निमित्ताने आज शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेच आयोजन करण्यात आल आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या सभेला राज्यभरातील मनसेसैनिकांनी मुंबईत दाखल होयला सुरुवात केली आहे.

लोकसभा विधानसभा आणि नजीकच्या काळात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला सपाटून पराभवाला समोर जाव लागल आहे. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये मरगळ आल्याच चित्र बघायला मिळाल. मात्र मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मोठे फेरबदल करत पक्षाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या निमित्ताने राज हे कार्यकर्त्यांसमोर काय संकल्प आणि कार्यक्रम ठेवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.