MNS- राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना धक्का

राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त

मुंबई – लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर आता राज ठाकरेंनी मनसेमध्ये मोठ्या खांदेपालटला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी सेना आणि महिला सेना वगळता सर्व अंगीकृत संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यापैकी वाहतूक सेना, रस्ते आस्थापना, जनहित कक्ष, रोजगार व स्वयंरोजगार, जनाधिकार सेना, लॉटरी सेना, कामगार सेना अशी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त करण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी आज पत्राद्वारे जाहीर केले आहे.

bagdure

बरखास्त केलेल्या पदांचा कुणीही गैरवापर केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर पक्षांतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचेही राज ठाकरे यांनी पत्रकामध्ये नमुद केले आहे. त्यामुळे आता पाडाधिकाऱ्यांच्या पद बरखास्तीच्या निर्णय मनसेला नवी उभारी देणार की आणखीन खोलात घेऊन जाणार हे पाहून महत्वाच ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...