बँकांचे मराठीकरण… नाहीतर पुन्हा खळखटय़ाक

raj sabha

ठाणे: ज्या मराठीच्या कार्डवर मनसेचा पाया उभा राहिला तोच मराठीचा मुद्दा मनसे पुन्हा हातात घेत आहे. आता राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक मराठीत कामकाज न करणाऱ्या बँकांविरोधात आंदोलन करणार आहेत असे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत दिलेत.

राज्यातील सर्वच दुकानांच्या पाटय़ा मराठीत असाव्यात, यासाठी आम्ही आंदोलन केले होते. त्यानंतर चित्र पालटले, पण तरीही अजून काहीजण सुधारत नसल्याने ते आंदोलन पुन्हा हाती घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.