संजय निरुपम हा फालतू माणूस, त्याने पुण्यात येऊन दाखवावं -अजय शिंदे

ajay shinde

पुणे – संजय निरुपम हा फालतू माणूस असून त्याने पुण्यात येऊन दाखवावं मग पहा आम्ही काय करतो ते असं खुलं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिलं आहे .कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी मनसेचं सुरु असणार आंदोलन हे भाजपच्या इशाऱ्यावरून सुरु असल्याचा आरोप केला होता त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आजच्या आंदोलनामुळे मराठी व्यावसायिकांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो जे नुकसान झालं असेल त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करून काय करायचं ते पाहू असं देखील शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे .

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेकडून टार्गेट करण्यात आले.

Loading...

पुण्यातील फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनाला कालच दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला असताना आज दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राजाराम पुलावरील फेरीवाल्यांच्या विरोधात आपले अस्त्र उगारले. या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे सामान, फळे व इतर वस्तू रस्त्यावर इतस्ततः फेकून माणसे कार्यकर्त्यांनी माणसे स्टाइलने आंदोलन केले.

मुंबईमधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून यापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला होता. मात्र, या दोन दिवसात फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. तथापि मनसे पदाधिकारी मुंबईत व्यस्त असल्याने पुण्यातील आंदोलन आणखी दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनसेकडून कालच सांगण्यात आले होते.

पहा व्हिडीओ

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी