निरुपम यांच्या घराबाहेर मनसैनिकांचा राडा

मुंबई- फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सुरु झालेला मनसे विरुद्ध निरुपम हा वाद आणखी चिघळला असून कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या निवास स्थानासमोर मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.फेरीवाल्यांनी केलेल्या हल्यात काही मनसेचे पदाधिकारी जखमी झाल्यानंतर मनसे अधिकच आक्रमक झाली असून निरुपम यांच्याकडून अनेक चिथावणीखोर विधाने सातत्याने येत आहेत .या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेतले.

Loading...

मालाडमधील मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील राजकीय युद्ध चांगलंच टोकाला पोहचलं आहे.मुंबईच्या अंधेरीतील संजय निरुपम यांच्या घराबाहेर आज मनसेनं आंदोलन केलं. निरुपम यांच्या लोखंडवालातील घराबाहेर भाज्या आणि फळांच्या गाड्या लावून आंदोलन करण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला. मात्र, यावेळी पोलिसांनी सात ते 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.दरम्यान, अवैध फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली आहे. मुंबईसह उपनगरांमधल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांवरुन पेटलेलं राजकारण भडकणार असल्याचं चित्र आहे. कारण आता काँग्रेसकडून फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.काँग्रेस येत्या बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येईल.दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...