खळखट्याक स्टाईल मनसेची पुणे महापालिकेत गांधीगिरी

mns protest in pmc

पुणे: पुणे महापालिकेच्या नागरवस्ती विभागात गेल्या १0 ते १२ वर्षापासून काम करणाऱ्या २३० संगणक ऑपरेटर कर्मचाऱ्यांना मुदत संपल्याने कामावरून काढण्यात आल आहे. या कर्मचाऱ्यांची फेरनिवडणूक करण्यात न आल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. दरम्यान या सर्व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर घ्यावे यासाठी नगरसेवकांना गुलाब पुष्‍प देऊन मनसेतर्फे गांधीगिरीने आंदोलन करण्यात आल .

कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक महिलांची संख्या आहे. त्यामुळे या महिलांना घर चालवन देखील अवघड झाल असून प्रशासनाने लवकरात लवकर या महिला कर्मचाऱ्यांची फेर नेमणूक करण्याची मागणी यावेळी माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी केली आहे. तसेच प्रशासनाला हात जोडून गांधीगिरीने केलेली मागणी कळत नसेल तर मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.